जळगांव

कु. लक्षिता पाटिल हिच्या वाढदिवसानिमित्त बापुजी फाऊंडेशन तर्फे सरकारी कर्मचाऱ्यांना १०१ रेनकोट वाटप

जळगाव l १८ जुलै २०२३ l भडगाव प्रतिनिधी l शहरातील विविध शासकिय कार्यालयातील कर्मचारी हे नागरिकांच्या सोई सुविधेसाठी वेळेची वाट न बघता कार्य करत असतात सध्या पावसाळा सुरु असल्याने नगरपालिका सफाई कर्मचारी, एम.एस.ई.बी. वायरमन, होमगार्ड यांना पावसाळ्यात संरक्षण व्हावे म्हणून स्व. बापुजी फाऊंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटिल यांची कन्या कु.लक्षिता पाटिल हीच्या सहाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत कर्मचाऱ्यांना १०१ रेनकोट मोफत वाटप करण्यात आले.
भडगाव तालुक्यात व शहरात सामाजिक, शैक्षणिक विविध कार्यात स्व. बापुजी फाऊंडेशन ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे. त्याची दखल घेत वेळोवेळी सामजिक कार्य करत असते.स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील व भडगाव न.प.च्या मा.नगरसेविका सौ.समिक्षा लखीचंद पाटील यांच्या कन्या कु.लक्षिता हीच्या सहव्या वाढदिवसाचे औचित्य साधत शासकीय कर्मचारी, नगरपालिका सफाई कर्मचारी, एमएससीबी वायरमन, होमगार्ड यांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी १०१ रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम दि.१८ रोजी सायंकाळी ५ वाजता बापुजी फाऊंडेशन कार्यालयाच्या आवारात पार पडला. या वेळी नगरपालिका सफाई कर्मचारी, वायरमन, होमगार्ड यांच्या सह निलेश पाटील, पिंटू मराठे, जहांगिर मालचे, देवा अहिरे, हर्षल पाटिल, बंटी सोनार, किशोर देशमुख, रविंद्र पाटील, अमोल पाटील, प्रथमेश पाटिल, भैय्या पाटिल, चेतन चौधरी, सोनू राजपूत, प्रदीप पाटील, चेतन काळे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. भविष्यात सुद्धा शहरात विविध सामजिक, शैक्षणीक, धार्मिक कार्यात बापुजी फाऊडेशन अश्याच प्रकारे मदत करणार असल्याचा मानस लखीचंद पाटिल यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button