
मांजा विक्री करणाऱ्या सात जणांवर कारवाई
जळगाव : पतंग विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी होत असल्याने, रस्त्यावर उभे राहून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर दर्शन संजय शिंपी (वय १९) याच्यासह अन्य सात जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी नशिराबाद रिक्षा स्टॉपजवळ केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी
नायलॉन मांजा प्रतिबंधित करण्यात आला आहे. तरी देखील त्याची बेकायदेशीररित्या विक्री केली जात असते. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील पतंग विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी करुन कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, सोमवार दि.१३ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या सपोनि साजीद मन्सूरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, अनिल कांबळे, पराग दुसाने यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
05 गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन सदर गुन्ह्यातील नायलॉन मांजा विक्री करणारे इसम नामे 1) मयुर दत्तु भोई वय-23 वर्षे रा., सदगुरुनगर, (आयोध्यानगर) प्लॉट नं. 32, सर्व्हे नं.42 जळगाव 2) भुषण गजानन बेलेकर वय- 24 वर्षे रा.डि.एन.सी. कॉलेज जवळ जळगाव 3) अफवान निहाल खान वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव 4) परवेझ शेख शफी शेख वय-24 वर्षे रा. काट्याफाईल बटाटा गल्ली जळगाव 5) दर्शन संजय शिंपी वय-19 वर्षे रा. आशाबाबनगर महादेव मंदीरासमोर जळगाव 6) गितेश भरत सैंदाने वय 18 वर्षे रा. आशाबाबानगर जळगाव 7) प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे वय 21 वर्षे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव 8) तुषार सुनिल माळी वय 23 वर्षे रा. विठोबानगर जुना खेडी रोड जळगाव अशा 08 इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर इसमांकडून 11 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील 2 दिवसात देखिल सदर मोहीम अशाच प्रकारे राबवण्यात येणार आहे.