खान्देशगुन्हेजळगांव

गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक 

गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : गावठी कट्टा बाळगून दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर येथे अटक केली. अर्जुन जनार्दन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ३ एप्रिल २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, अर्जुन कोळी हा घोडसगाव ते मुक्ताईनगर रोडवरील प्रेम प्रतिक टी सेंटरजवळ गावठी पिस्टलसह फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडून अंदाजे २०,००० रुपयांच्या किंमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले.

याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. ९९/२०२५ अंतर्गत आर्म्स अॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button