खान्देशगुन्हेजळगांव

महावितरणच्या वीज ग्राहकांनी भरले २१० कोटी रुपये

जळगाव : ग्राहक सुविधांसाठी महावितरणकडून सातत्याने नवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत यासाठी ऑनलाईन वीजबिल भरणा प्रक्रियेला गती देण्यात येते. महावितरणच्या वा ऑनलाईन पध्दतीला जळगाव परिमंडलातू‌नही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०२४ या महिण्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलातून उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ५ लाख २० हजार ४५९ वीज ग्राहकांनी २१० कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

ऑनलाईन विजबिल भरणा पध्दतीमुळे ग्राहकांना रांगेत उभे राहून अधिकचा वेळ खर्ची घालवण्याची गरज नाही. ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. शिवाय, वीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.

ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एस एम एस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही सुरु असून ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फे आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एस

एम एस सेवा सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातून नोव्हेंबर महिन्यात ३ लाख ४५ हजार ग्राहकांनी १२७, ५६ कोटी रुपयांचा ऑनलाईन विजबिल भरणा केला, धुळे जिल्ह्यातून एक लाख १९३८३ ग्राहकांनी ६५.१३ कोटी तर नंदूरबार जिल्ह्यातून ५५ हजार ८७७ ग्राहकांनी १८ कोटी ४ लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला.

आपल्याकडे संगणकावर किंवा महावितरण मोबाईल अॅप व महापांबरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत तिष्ठत

उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ऑनलाईन अॅप्लीकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकाला आपले वीजबिल केव्हाही आणि कुठू‌नही भरता येते. एस एम एस सेवेसाठी विज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button