चाळीसगाव ( प्रतिनिधी) ;- येथील रेल्वे स्टेशन वरून रेल्वे चढत असताना महिलेच्या पर्स मधील अडीच लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांसह एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 8 डिसेंबर रोजी शितल कैलास पाखले या धुळे मुंबई रेल्वे चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील पर्स व त्यामध्ये ठेवलेले दोन लाख 50 हजार रुपयांची रक्कम व इतर कागदपत्र असे ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता . या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक स्वाती भोर ,सूर्यकांत बांगर, सुरेश भाले ,रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी चित्रेश जोशी, विभागीय सुरक्षा आयुक्त राजेश कुमार केसरी ,अतुल टोके यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज तपासून व गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते यांच्या पथकाने संशयित अर्जुन उर्फ गोलट्या कानिफनाथ भोसले वय 25रा. धरणगाव ता कोपरगाव जि. अहिल्यानगर, अक्षय बाळासाहेब नन्नवरे वय 23 आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दोन लाख 19 हजार रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते पीएसआय नंतर रेणुके पंकज पाटील मोहसीन अली सय्यद, फरीदा तडवी, रेल्वे सुरक्षा बलाचे चाळीसगाव येथील पी डी पाटील, उपनिरीक्षक किशोर चौधरी, रेहान अहमद, गोविंद राठोड यांनी संशयीतांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याची कारवाई केली.