जळगाव प्रतिनिधी;- आंध्रप्रदेश राज्यात गोदावरी जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांब्याचे तारांचे भंगार विक्री करण्याचे आमिष दाखवून त्याला जळगाव येथे बोलावून पाच जणांनी बेदम मारहाण करून त्याचे कडून 90 हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी सूत्रे फिरवीत पाच जणांना अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आंध्रप्रदेश येथील दुर्गा वेंकटेश राव सूर्यनारायण काटा कोटा वय 41 हे तांब्याची तार भंगार खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. त्यांना मागील आठवड्यात तांब्याची तार चे भंगार विक्री असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी हे भंगार पाहण्यासाठी जळगावला नऊ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भादली गावात आले. तेथून त्यांनी एका जणाला फोन लावला असता चहा टपरी वाल्याने व्यापाऱ्याला दुचाकी वर बसून पंप हाऊस येथे नेले .तिथे त्या 4 अनोळखी इसमानी व्यापाऱ्याला पकडून बेदम मारहाण करीत सोन्याची साखळी, मोबाईल, महागडे घड्याळ जबरदस्तीने हिसकावून त्याच्या फोन पे करून पन्नास हजार आणि चाळीस हजार असे एकूण 90 हजार रुपये ऑनलाईन बळजबरीने ट्रान्सफर करून घेतल्याची घटना घडली. या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून दहा डिसेंबर रोजी नशिबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी वेगात चक्र फिरवून हल्लेखोर प्रद्युम्न गुलाब पवार वय 22 अंजीर भास्कर भोसले वय 35 ,पप्पू गुलाब पवार 23 ,सोन्या उर्फ सोना गुलाब पवार वय 28, किशोर उर्फ किरण पवार 24 सर्व रा.हलखेडा तालुका मुक्ताईनगर यांना अटक करण्यात आली . याबाबत माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.