धरणगाव तालुक्यातील दोन गाव जवळील घटना
धरणगाव /प्रतिनिधी | चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने धरणगाव तालुक्यातील दोन गावाजवळ विद्युत खांद्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये विद्यार्थ्यां सह 28 प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 13 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाची लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) नेहमीप्रमाणे शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव यांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. बस थेट नाल्यात न जाता इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील भयंकर अनर्थ टाळला.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे
मयुरी पाटील वय-१४, आधार सोनवणे वय-४५, लावण्या सोनवणे वय-११, सायली पाटील वय-१५ हर्षा पाटील वय-१३, गुंजन सपकाळे वय-१६ जनाबाई पाटील वय-५५, अजय पाटील वय-१३, कुंदन पवार वय-१३, सुनीता भिल वय-४६, काजल पाटील वय-१५, मोहिनी शारद पाटील वय-१७, भावना शांताराम पाटील वय-१६,अशोक जगन पाटील वय-५७, वालात्री शंकर शिरसाट वय-५३, कुणाल गुंजाळ पवार वय-१३, रेखाबाई विशाल दांडेकर वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव, जिजाबाई पंढरीनाथ पाटील वय-६२, पंढरीनाथ आत्माराम पाटील वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव, जगन भीमराव पवार वय-४२, विश्वनाथ सदाशिव पाटील वय -७१, निखिल सुधाकर पाटील वय-२३, तन्मय मंगल पाटील वय-१९, गुंजन सुनील पाटील वय १४, विवेक छगन पाटील वय -१७, राम शरद अवचिते वय-१३, जयेश चंद्रकांत पाटील वय-१६, सायली सुरेश पाटील (वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोनगाव लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.