भुसावळ :-गुरुकुल मध्ये राहणाऱ्या एका खोलीत 28 वर्षीय स्वामींनी छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल येथे शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले असून यामुळे खळबळ उडाली आहे.
ऋषीस्वरूपादास महाराज (वय २८) असे मयत स्वामींचे नाव असून त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव रोडवरील श्री स्वामी नारायण गुरूकुल येथे राहत असलेले स्वामी ऋषीस्वरूपादास हे शनिवारी गुजराथमधील वडताल येथे मोठ्या स्वामींसोबत जाणार होते. मात्र त्यांना त्यांना सकाळी सर्वांनी आवाज दिला, मात्र त्यांनी काहिच प्रतिसाद मिळाला नाही. तर दोन ते तीन वेळा आवाज दिल्यावर काहिही प्रतिसाद मिळत नसल्याने काही जणांनी थेट वर जाऊन खिडकी उघडली असता आत स्वामी त्रऋषीस्वरूपादास यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यामुळे गुरुकुल परिसरात खळबळ उडाली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.