जळगाव : स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या उपनिरीक्षकांचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौतम सांडू केदार (वय ५६, रा. पोलीस लाईन) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचे उपचार दरम्यान निधन झाले.
दरम्यान केदार यांची वर्षभरापुर्वी उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती. पदोन्नती
गौतम केदार हे बंदोबस्तासाठी स्वामीनारायण मंदिर येथे तैनात होते. कर्तव्यावर हजर असतांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रविवारी दुपारच्या सुमारास उपनिरीक्षक केदार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.