महाराष्ट्रदेश-विदेशशासकीय

नव्या वर्षात ३,५००  लाल परी रस्त्यावर धावणार-भरत गोगावले

मुंबई वृत्तसंस्था: एसटीचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी नव्या वर्षात सुमारे ३,५०० नव्या साध्या लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची  अध्यक्ष व मंत्री भरत गोगावले यांनी घोषणा केली असून पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की,सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता असून, एसटीच्या ताफ्यामध्ये आज रोजी १४ हजार बसेस असून कोरोनापूर्वी एसटीकडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षांत एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच बसेसची संख्या कमी असल्याने महामंडळाकडून प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होत नाही

या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन-दोन तास वाट पाहत बसणे, अशा तक्रारी कमी होतील, असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केले. राज्यातील सर्व बस स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके शासनाच्या निधीतून, तर काही बस स्थानके बांधा वापरा-हस्तांतरीत करा या तत्त्वावर खासगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button