जळगाव ;- महिला मंदिरात देवपूजा करण्यासाठी गेली असता घरात लागलेल्या आगीत संपूर्ण खाक झाल्याची घटना कोळीपेठ परिसरात घडली आहे. आगीच्या भक्षस्थानी असताना मुलास जाग आल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवून मदतीसाठी आरडा ओरड करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. येथील रहिवासी, शीतल कडू मराठे (वय ४०) ह्या कोळी पेठेत शितल या मुलगा हेमंत सोबत वास्तव्याला आहे.
आज सकाळी आठ वाजेपुर्वी शितल मराठे या देव पुजेसाठी मंदिरात गेल्या होत्या. घरात मुलगा हेमंत झोपलेला असतांना अचानक त्याला श्वात्सोश्वास घेण्यास त्रास होवुन धुराचा वास आल्याने तो झोपेतून उठला. तेव्हा घरातील फ्रिज जवळून आगीचे लोळ उठत होते. मात्र, संपूर्ण घर जळू लागल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरुण पांघरुणासह संपुर्ण साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती कळाल्यावर शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तलाठी राहुल सोनवणे, कोतवाल सुखदेव तायडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानाची सखोल माहिती घेतली. शॉटसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.