जळगाव प्रतिनिधी ;-१८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून जगात साजरा केला जातो. अल्पसंख्यांक समाजाचे हक्काचे संरक्षण करण्यासाठी हा दिन पाळला जातो.
अल्पसंख्यांक हक्क दिनाचा उद्देश समाजात अल्पसंख्यांकांच्या हक्काबद्दल जागृती पसरविणे आणि त्यांच्यासाठी समान आणि न्याय समाज सुनिश्चित करणे हा आहे.
सर्व समुदायांना त्यांचे हक्क मिळावेत आणि त्यांचा आदर केला जावा यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो.
त्यामुळे अल्पसंख्यांक समाजासाठी समानता आणि सुसंवाद वाढवणे महत्त्वाचे असल्याने एकता संघटनेने हा दिवस प्रत्येक मोहल्यामध्ये कॉर्नर मीटिंगच्या माध्यमाने माहिती देऊन साजरा केला.
मुख्यमंत्री व अल्पसंख्यांक आयोगास निवेदन
अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या माध्यमाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र व केंद्रीय गृहमंत्री तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग यांना १० मागण्याचे निवेदन अँड आमिर शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील मुख्य मागण्या
संविधानानुसार अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क देण्यात यावे.
वक्फ कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता कामा नये.
प्रार्थना स्थळे विशेष तरतुदी अधिनियम १९९१ म्हणजे भारतातील प्रार्थना स्थळाचे धार्मिक स्वरूप राखण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी जो कायदा करण्यात आलेला आहे त्याची कठोर अंमलबजावणी करणे.
मोबलींचीग, गोरक्षक मार्फत होणाऱ्या हल्ले तसेच गणवेश व दाढी, टोपी बघून होणारे हल्ले व बुलडोझर ची प्रक्रिया सुद्धा त्वरित थांबवण्यात यावी.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्ये अल्पसंख्यांक आयोगातील पदे त्वरित भरून त्या माध्यमाने १५ कलमी पंतप्रधानांची योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी.
अल्पसंख्यांक समाजात शिक्षणामध्ये घटनेनुसार आरक्षण देण्यात यावे.
केंद्र व राज्य सरकारच्या कायदेमंडळात म्हणजेच लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यावर अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधींना विशेष बाब म्हणून त्यांची नियुक्ती/निवड करण्यात यावी.
अल्पसंख्यांक समाजाबाबत शासनाने नेमलेल्या विविध समित्यांचा जो अहवाल सरकारकडे प्राप्त आहे त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. (सच्चर समितीचा अहवाल)
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
कूल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, मलिक फाउंडेशनचे संचालक नदीम मलिक, काँग्रेसचे सलीम इनामदार, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे सहसचिव बाबा देशमुख, एम पी जे चे आरिफ देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सय्यद इरफान अली, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, शाह बिरादरीचे अनिस शाह व शरीफ शाह , एम आय एम चे मोहम्मद इमरान व शेख सहिद ,नशिराबाद चे मोहम्मद फजल व अक्सा फाउंडेशनचे वसीम शेख व अँड आमीर शेख यांची उपस्थिती होती.