
जळगाव प्रतिनिधीI हळदीच्या कार्यक्रमांमध्ये गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे घटना शहरातील इंद्रप्रस्थ नगर मधील राजाराम हॉल येथे घडली. या प्रकरणी तरुणांकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथे एका मंगल कार्यालयात गोंधळ सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाला 22 रोजी रात्री मिळाल्यानुसार पथक तिथे गेल्यानंतर त्यांना अतुल बजरंग तांबे वय-३१ रा.राजगुरू नगर, जि.पुणे हा गावठी पिस्तूल सह मिळून आला.
गावठी कट्टा मिळाल्याची माहिती
पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्यानंतर. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहायक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी मंगल कार्यालयात धाव घेतली. अतुल तांबे याने याच्याकडे असलेल्या बॅगेतून गावठी बनावटीचे पिस्तुल काढून दिले. पळून गेलेल्या एकाचे नाव माया तर दुसऱ्याचे माहिती नसल्याचे त्याने सांगितले.
हवालदार उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.