जळगाव प्रतिनिधी I ;- इकरा युनानी मेडीकल महाविद्यालयाची शैक्षणीक सहल दिनांक 17 रोजी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख यांच्या मर्गदर्शन मध्ये हैदराबाद येथे रवाना झाली. हि शैक्षणिक सहल दिनांक 17 ते 22 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले होती. यात महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी होते. यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार दर वर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. हैदराबादमध्ये चाऊ मोहल्ला पॅलेस, सालार जंग म्युजियम, चार मिनार या एतिहसिक वास्तु विद्यार्थ्यांना दाखवून त्याची माहिती देऊन
त्या वेळेस या वास्तुंची निर्माण करण्यामागचे कारण व उपयोग काय हे सांगितले. या एतिहासिक वास्तु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. तसेच हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी हि आजच्या आधुनिक युगातील योग्य उदाहरण आहे. तसेच हैदराबाद मधील वंडरला वाटरपार्क मध्ये अतिउत्तम लाईटींगचे प्रदर्शन हे इंजिनियरींगचे कमाल आहे. तसेच विद्यार्थ्यांना एन टि आर पार्क दाखवण्यात आले. या सर्व सहली मध्ये विद्यार्थ्यांनी मनसोख्त आनंद घेतला. या सहली मध्ये विद्यार्थ्यांना डॉ. नाजेमा खान व डॉ. सुमैय्या शेख यांनी वेळो वेळी मार्ग दर्शन केले. शाहिद शाह यांनी परिश्रम घेतला.