देश-विदेश

Iभारताचे माजी पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था Iभारताचे माजी पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंगहे २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.

मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारतातील पंजाब प्रांतातील गाह गावात झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. तो लहानपणापासून हुशार विद्यार्थी होते. पंजाब विद्यापीठातून पदवी चे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले.

डॉ.सिंह यांनी १९५० च्या दशकात आर्थिक घडामोडींचे संशोधक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे १९७१ मध्ये त्यांची भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले.

१९९१ मध्ये भारत गंभीर आर्थिक संकटातून जात असताना डॉ. मनमोहन सिंह यांची अर्थमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली. भारताला आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावर नेणाऱ्या ऐतिहासिक आर्थिक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची दारे खुली झाली आणि आर्थिक विकासाला गती मिळाली.

मनमोहन सिंह २००४ ते २०१४ या दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button