खान्देशगुन्हेजळगांवदेश-विदेशशासकीय

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका कारला एका तासात १० चलान; परिवहन विभागावर अन्यायकारक कारवाईचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक अजब प्रकार घडला असून, एका कारचालकावर फक्त एका तासाच्या प्रवासात तब्बल १० चलान लावण्यात आले आहेत. २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत एमएच ४६ एएक्स १२०४ या क्रमांकाच्या वाहनाने एकतर्फी प्रवास केला. यावेळी चालकाने सीट बेल्ट न घातल्याचे कारण देत हे चलान आकारण्यात आले आहेत.

या प्रकरणावरून वाहतूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांनी यासंदर्भात परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रदीप वाघमारे यांनी विभागावर आरोप करत सांगितले की, “परिवहन विभाग केवळ सर्वसामान्य नागरिकांवरच कठोर कारवाई करत असून, व्यावसायिक आणि अवजड वाहनांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.” त्यांनी या अन्यायकारक चलनांची तत्काळ रद्द करण्याची मागणीही केली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले, “वाहतूक नियम उल्लंघनासाठी २४ तासांत एकाच प्रकारचे एकच चलान आकारले जाते. जर एका व्यक्तीवर त्याच कारणासाठी अनेक वेळा दंड आकारला गेला असेल, तर ते चलान रद्द करण्यात येतील.

या प्रकारामुळे सोशल मीडियावरही संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी ही घटना शेअर करत वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. नियमांचं पालन करणं आवश्यक आहेच, पण त्याचवेळी नियम लावताना न्याय्य व पारदर्शक प्रक्रिया असणं अपेक्षित आहे, अशी नागरिकांची भावना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button