मोठी बातमी : शरद पवारांना धक्का ; शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होणार
मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादीच्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. राष्ट्रवादीच्या ४१ बंडखोर आमदारांवर निलंबणाची कारवाई करा, यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर नकार देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे एकत्रित सुनावणी घेऊ असं कोर्टाने म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील ४१ आमदारांच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार घेणार होते. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी दोन्ही प्रकरणं एकत्रित ऐकू असं कोर्टाने म्हटलं आहे. ३ ऑक्टोबरला सुनावणी झाली नाही, याबद्दल कपिल सिब्बल यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की आम्ही त्यांना वेळापत्रक द्यायला सांगितलं आहे, त्यांनी त्यावर काम सुरू केलं आहे. त्यामुळे ही सुनावणी आता पुढे जाणार आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आमदारांवरील अपात्रेच्या निर्णयाबाबत दिरंगाई करत आहे. यासंदर्भात सुरूवातीने ठाकरे गटाने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रकरणाबाबतही जयंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु स्वतंत्र सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला असून आता यापुढील सुनावणी एकत्रित होणार असल्याचं म्हटलंय.