
वाईन शॉपमधून दहा लाखांचा मद्यसाठा चोरणाऱ्या मुख्य संशयितला छत्रपती संभाजीनगर मधून अटक
जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई
जळगाव: इच्छादेवी चौकातील महामार्गालगत असलेल्या अशोका लिकर गॅलरीतून १० लाखांचा मद्यसाठा चोरीप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव येथून सलीम उमर पठाण (वय ३५) याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेले एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
तपासात आणखी तीन संशयितांची नावे समोर आली आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण याने पडेगाव येथून भाड्याने वाहन घेऊन चोरी केलेला मद्यसाठा छत्रपती संभाजीनगर येथे नेला.
तेथून मालेगाव येथील चोरट्यांनी तो दुसऱ्या वाहनात हलवला. ही चोरी २३ एप्रिल रोजी इच्छादेवी चौकातील पोलिस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या या दुकानातून झाली होती. पोलिसांचा तपास सुरू आहे.