,जळगांव – हजरत सैय्यशाह मदार फाऊंडेशन सावदा तर्फे मुस्लिम समाजातील विविध जातीचे मुला-मुलींचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या संस्थेचे विवाह सोहळ्याचे द्वितीय वर्ष होते. या विवाह सोहळ्यात ५ जोडपे यतीम होते. व इतर जोडपे हे गरीब घराण्यातील होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जळगांवचे समाजसेवक अजमल शाह अब्दुल्ला शाह हे होते. विवाह सोहळ्याचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सेक्रेटरी व एम.पी.सी.सी.चे सदस्य व गरवारे क्लब मुंबईचे डायरेक्टर . शाह आलम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक फिरोज खान हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अलहाज रफिक शाह सर (अध्यक्ष मिल्लत हायस्कुल, जळगांव), राजु शाह (सावदा), मजिद जकेरिया (मेमन फाऊंडेशन), हाजी अजमल शाह अब्दुल्ला शाह • हाजी हारून शेठ (डायमंड स्कुल, सावदा), अॅड. सलिम शेख (जळगांव), गुड्डु मेंबर (सावदा), सुरेश परदेशी (शिवसेना सावदा), जावेद शाह (वरणगांव), वाहेद खान (जळगांव), सैय्यद शकील (सावदा), मोहम्मद ताहेर (सावदा) आदि उपस्थित होते. शाह आलम मुंबई यांनी आपल्या भाषणात प्रथम त्यांन या विवाह सोहळ्यात
निमंत्रित केल्याबद्दल समासेवक अजमलशाह अब्दुल्ला शाह यांचे मनापासुन आभार मानले व संस्थेने ११ जोडप्यात ५ मुले-मुली अनाथ असल्याचे पदाधिकाऱ्यांचा गौर केला. तसेच इतक्या लहान शहरात मदार फाऊंडेशनने मुस्लिम समाजाचे विविध जातीतील विवाह सोहळा घडविला ही बाब कौतुकास्पद आहे. याचे उदाहरण सर्व मुस्लिम संस्था चालकांनी घ्यावे. तसेच मुलांनी आपली रूची क्रिकेट या खेळात वाढावी व देशासाठी चांगले क्रिकेटर घडवावे असे आवाहन केलेले आहे.
तसेच अजमल शाह अब्दुल्ला शाह यांचे तोंडभरून कौतुक केले की, त्यांनी शाह फकिर समाजाला विमुक्त जातीची सवलतीसाठी परिश्रम करून त्यांच्या टिमच्या सहकार्याने समाजाला मिळवुन दिलेली आहे. शाह फकिर समाजात एक अनमोल असा हिरा म्हणून समाजाला अजमल शाह चे रूपाने लाभलेला आहे. खरचं त्यांचे कौतुक आहे. म्हणून महाराष्ट्रातुन विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना आतापर्यंत १९ पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे असे मला समजले व आज देखील या विवाह सोहळ्यात मदार फाऊंडेशन तर्फे माझ्या हस्ते अजमल शाह यांना सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले याचा मला अभिमान आहे.
तसेच या फाऊंडेशनला ते मार्गदर्शक म्हणून चांगले कार्य करीत आहे. म्हणूनच या मोठ्या विवाह सोहळ्याला पुर्णपणे कामयाबी मिळाली अशी मी ग्वाही देतो.
यावेळी हाजी रफिक शाह सर (मिल्लत हायस्कुल जळगांव) यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मदार फाऊंडेशनने मुस्लिम समाजातील विविध जातीच्या लोकांना घेवुन यतीम मुलांचे विवाह करून एक आदर्श घडविलेला आहे. यामुळे समाजात फिजुल खर्चाना आळा बसेल. तसेच मुस्लिमांना आवाहन केले की, हुजुरे पाक यांच्या सुन्नत प्रमाणे मुस्लिमांनी सादगीने कमी खर्चाचे आपल्या मुला-मुलींचे विवाह करावे.
शेवटी अध्यक्षीय भाषणात फिरोज मेंबर सावदा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले आहे की, शाह आलम साहब मुंबईहून आमच्या सावदा शहरात आले व या मदार फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती दिली म्हणून त्यांचे कौतुक करतो तसेच समाज सेवक अजमलशाह अब्दुल्ला शाह यांनी मदार फाऊंडेशनचे मार्गदर्शकम्हणून कौतुकास्पद काम केले. व या विवाह सोहळ्याला एक मोठी कामयाबी मिळवून दिली असे म्हटले. मुस्लिम समाजाच्या लोकांनी या आदर्श विवाहाचा प्रेरणा घेवुन सादगीने विवाह करावे. व समाजातील विविध संस्थांनी देखील अशा प्रकारे कार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
यावेळी मुंबईचे शाह आलम साहेब यांना मतदार फाऊंडेशनकडून सन्मानचिन्ह देवुन फेटा, पगडी बांधुन गौरविण्यात आले आहे. व जळगांवचे समाजसेवक अजमल शाह अब्दुल्ला शाह यांना समाजकार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह देवुन फेटा, पगडी बांधुन गौरविण्यात आले आहे. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साबीर मुस्तफाबादी (शायर) यांनी केले आहे.
आभार हाजी अजमलशाह अब्दुल्ला शाह यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे विशेषतः शाह आलमजी यांचे आभार मानले. तसेच संस्थेचे सर्व कार्यकर्त्यांचे व नवरा-नवरीचे नातेवाईकांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमीन शाह, समीर शाह, मुस्तुफा शाह, इमरान शाह, कलीम अली, मुज्जम्मील शाह, अलताफ तडवी, बाबु शाह, बबलु तडवी, शाहरूख आदिंनी परिश्रम घेतले.