मुंबई / जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या असून याबाबतचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. गेल्या वर्षी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्विकारला होता.
राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उप आयुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा. आर., पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन. टी. ठाकूर यांचा समावेश आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आदेश गुरुवारी गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले.
सर्व पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीनंतर नेमणूक त्याच ठिकाणी राहणार असून पुढील काळात त्यांची पदोन्नती होऊन इतर ठिकाणी नेमणुक केली जाईल.