खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत “सुबन्या आणि…” प्रथम, द्वितीय “सेकंड हॅन्ड “, तृतीय पेढे वाटा पेढे “

बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, नूतन मराठा महाविद्यालयाच्यावतीने आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत जळगांव येथील नूतन मराठा महाविद्यालयाची “सुबन्या आणि..” ही एकांकिका प्रथम आली.

स्पर्धचे उदघाटन क.ब. चौ. उमवी विद्यार्थी विकास विभाग संचालक प्रा डॉ जयेंद्र लेकुरवाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.अशोक पाटील ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .एन जे पाटील, परीक्षक विशाल जाधव , शरद भालेराव ,नागसेन पेंढारकर उपप्राचार्य डॉ के बी पाटिल, प्रा. संजय पाटील हे उपस्थित होते. या वेळी नटराज पूजन, दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन व घंटानाद करून झाले. उदघाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.एन जे पाटील यांनी केले.

प्रा.डॉ. यांनी,जयेंद्र लेकुरवाळे यांनी विद्यार्थी कलावंतांच्या नाट्य कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाविद्यालयानी स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग वाढावा यांसाठी पुढच्या वर्षी पासून प्रत्येक महाविद्यालयात नाट्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचा मानस आहे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांनी स्पर्धेचे आयोजनाची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले तसेच अश्या प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो असे सांगितले.

दिवसभर झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकांकिका स्पर्धेनंतर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा पालवे,अध्यक्ष प्राचार्य एल पी देशमुख, डॉ एन. जे. पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. अशोक पाटील, परीक्षक विशाल जाधव, शरद भालेराव, नागसेन पेंढारकर, उपप्राचार्य के.बी.पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अफाक शेख यांनी केले. तर आभार प्रा.डॉ के. बी. पाटील यांनी मानले.

*स्पर्धेचा निकाल*
सांघिक एकांकिका : प्रथम- नूतन मराठा महाविद्यालय, जळगांवची ‘सुबन्या आणि…’, द्वितीय – डॉ. सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा येथील ‘सेकडं हॅन्ड ‘, तृतीय – त्रिमूर्ती अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव यांची ‘पेढे वाटा आणि पेढे’ तर उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगांव यांची एकांकिका “गोंधळात गोंधळ ”

उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम -हनुमान सुरवसे (सुबन्या), द्वितीय – तेजल पाटील – (सेकंड हॅन्ड), लेखन : प्रथम – हनुमान सुरवसे (सुबन्या आणि..) द्वितीय -राहुल सोनवणे (पेढे वाटा पेढे), उत्कृष्ट नेपथ्य : प्रथम – हर्षल निकम, सागर खैरनार (सेकंड हॅन्ड), द्वितीय – मुकेश राठोड (पेढे वाटा पेढे), उत्कृष्ट प्रकाश योजना : प्रथम – पूनम पाटील (सुबन्या), द्वितीय – नरेंद्र कोळी चव्हाण (सेकंड हॅन्ड), उत्कृष्ट पार्श्वसंगीत : प्रथम – मोहित सोनावणे, निर्मल राजपूत, किमया बिऱ्हाडे (सुबन्या), द्वितीय – पूनम बडगुजर (सेकंड हॅन्ड), उत्कृष्ट रंगभूषा : राजश्री बरभैय्या (पेढे वाटा पेढे) उत्कृष्ट अभिनय : पुरुष – प्रथम हनुमान सुरवसे (सुबन्या आणि…), द्वितीय हर्षल पाटील (सेकडं हॅन्ड), उत्कृष्ट अभिनय : महिला – प्रथम रचना अहिरराव (सेकंड हॅन्ड), द्वितीय – शीतल नेवे (पेढे वाटा पेढे), उत्तेजनार्थ प्रमाणपत्र – रमजान शेख, भाग्येश चौधरी, संजना तायडे, हर्षल पाटील, दीपक पगारे, पूनम जावरे.

०००००००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button