खान्देशसामाजिक

बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी

शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने

जळगाव प्रतिनिधी – पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी शिंजीनी कुलकर्णी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंताने देश विदेशात आपल्या कलेतुन भुरळ घातली. तिच लय आज कथक नृत्यविष्कारातुन जळगावकरांनी अनुभूवली. अनिरुद्ध आयठल याने शास्त्रीय व उपशात्रीय गायनातुन तरणा ‘तोम ता देरेना’ सादर करून श्रोत्यांच्या हृदयात कायमची जागा कोरली.

‘ध्यास निरंतर स्वर साधनेचा’ या थिमवर असलेल्या यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सवास दुसरा दिवसाची सुरवात अनिरुद्ध आयठल याच्या शास्त्रीय व उपशात्रीय गायनाने झाली. सुरवात राग मारू बिहाग मधील विलंबित एक तालात निबध्द बडा ख्याल, ‘रसिया हुना जावो ‘ या ख्यालाने झाली. द्रृत बंदिश तिन तालात निबध्द होती व बोल होते ‘मन मे रहो’ यानंतर अनिरुद्ध ने रूपक तालातील मध्य लयीत राग जोग सादर केला. बोल होते ‘सुगरा कल निया’ त्यानंतर तराणा तोम ता देरेना सादर करून रसिकांची वाह वाह मिळवली‌ राग अडाणातील आडा चौताळात निबध्द त्रिवट सादर केली. त्यानंतर शुरा मी वंदिले हे नाट्य पद व रंगगीत सादर केले. अभंग पद्मनाथा नारायणा सादर करून भक्तीमय निर्माण केले. त्याला तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिषेक सिनकर, तंबोरावर वरूण नेवे, भुषण खैरनार यांनी साथ संगत केली.

शिंजीनी कुलकर्णी हिने कथक नृत्याच्या सादरीकरणास शिव वंदनेने केली. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी लिहलेली व संगीतबध्द केलेली निरतक शंकर पार्वती संग सादर केले. विलंबित तिन ताल मध्ये 13 मात्रांच्या जद तालातील अनवट कथक मधील ताल सादर केला. कथक मधील क्रमानुसार थाट-आमद-तुकडे सादर केले. सादरीकरणाच्या शेवटी पद्मविभूषण बिरजू महाराज यांनी लिहलेली बिहारी को बस कर पाओ सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कुलकर्णी हिला विवेक मिश्रा (तबला व पढंत) सोमनाथ मिश्रा (संवादिनी व गायन) प्राजक्ता गुर्जर (सतार) यांनी संगत दिली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे आहेत.

दीपप्रज्वलन व कलावंताच्या स्वागतावेळी माजी आमदार मधुभाभी जैन, रेकी मास्टर शिवस्वरोदर शास्र पारंगत ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ प्रमोद कुलकर्णी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे डॉ. अनिल पाटील यांची उपस्थिती होती.

स्व.चांदोरकर प्रतिष्ठानचे शरदचंद्र छापेकर, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, नूपूर खटावकर व पदाधिकारी यांनी मान्यवरांसह मंचावरील कलावंतांचे स्वागत केले. निवेदन जुई भागवत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button