जळगाव I प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशन नागपूर आयोजित ३४ वी राष्ट्रीय सेपक टकरॉ निवड स्पर्धा ८ डिसेंबर ते ८ जावेवरी या कालावधीत अवधेश क्रीडा मंडळ वर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला, त्यात जळगाव जिल्ह्यातील तनवीर शाह ,अबुझर बागवान यांनी निवड स्पर्धेत सहभाग घेतला.
निवड स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूं पैकी *तनवीर शाह ,अबुझर बागवान* यांची ३४ वी सीनिअर राष्ट्रीय सेपाक टकरॉ स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, ही स्पर्धा १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत हनामकोंडा,वारंगल,तेलंगणा येथे होणार आहे. तनवीर शाह ,अबुझर बागवान या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्हा सेपक टकरॉ असोसिशन चे अध्यक्ष एजाज अब्दुल गफार मलिक, प्रा. चंद्रकांत सोनवणे डॉ. प्रदीप तळवलकर, सचिव इकबाल मिर्झा, वसीम मिर्झा, शेहबाझ शेख,आसिफ मिर्झा, फैजान शेख, मोहम्मद अमीर खान, इम्रान शेख सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले त्यांचे अभिनंदन केले.