पतंग उडविताना तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून चिमुकला खाली पडून गंभीर जखमी
जळगाव प्रतिनिधी I शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पतंग उडवीत असताना दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रामेश्वर कॉलनी परिसरात असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराजवळ श्लोक कैलास गिरगुणे हा सात वर्षीय बालक त्याच्या जुळ्या भावासोबत आज मकर संक्रांतीच्या 14 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून पतंग उडवीत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. यावेळी त्याला गंभीर जखम झाल्याने कुटुंबीयांनी जळगाव शहरातील रामनगर मध्ये असणारे सारा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.