सारथी देणार जिल्ह्यातील ५०० तरूणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण
ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन…
जळगाव l २५ जुलै २०२३ l छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) मार्फत जिल्ह्यातील मराठा, कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी – मराठा समाजाच्या ५०० तरूणांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तरूणांनी ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तरूणांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
नोंदणी करतांना तरूणांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विदयालय परीसर, जी.एस.ग्राऊंड जवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत) शक्य असल्यास प्रत्यक्ष अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक- ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहनही श्री.मुकणे यांनी केले आहे.