![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2025/01/InShot_20250129_162609272-780x470-1.jpg)
शरद भालेराव यांचे सलग पंचवीस तास एक पात्री नाट्यप्रयोग ; लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद
जळगाव प्रतिनिधी
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शरद भालेराव यांनी सतत 25 तास मी सावली भिमाची हा एकपात्री नाट्य प्रयोग सादर करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले .या रेकॉर्ड ला दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सुरुवात झाली, आणी दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजुन 30 मिनिटांनी बंद झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ . पी.आर. चौधरी व डॉ. एल पी . देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नाट्य परिषदेचे पद्मनाभ देशपांडे चिंतामण पाटील प्रा. राजेंद्र देशमुख विजय कोसोदे हे उपस्थित होते.
नुतन मराठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये
या रेकॉर्ड ला सुरुवात झाली 25 तास सादर झालेला मी सावली भिमाची हा एकपात्री प्रयोग जळगाव शहरातील किमान दीड हजार लोकांनी पाहिला. या एकपात्री नाट्यप्रयोगाचे 25 तासात 19 प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग हा 1 तास 20 मिनिटांचा होता. या आधी शरद भालेराव यांनी रांगोळी तुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 17 हजार स्क्वेअर फूटाचे पोर्ट्रेट काढून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे. मी सावली भिमाची हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपले दुसरे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. या कार्यक्रमास शरद भालेराव यांच्या विश्व विक्रमाचे कौतुक करण्यासाठी जळगाव चे आमदार मा. राजुमामा भोळे यांनी भेट दिली. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांनी शरद भालेराव यांचा सत्कार केला. या रेकॉर्ड साठी किशोर सुर्यवंशी, वैभव सोनवणे, प्रबुद्ध भालेराव हरिश्चंद्र सोनवणे विलास यशवंते विठ्ठल भालेराव कुलदीप भालेराव यांनी सहकार्य केले.