
हल्ला प्रकरणातील खंडपीठातून नागेश पाटील यांनी अटकपुर्व जामीन अर्ज घेतला मागे
जळगाव प्रतिनिधी
आरटीओचे कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे व महिला वकील रेखा इंगळे या दाम्पत्याच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरटीओ कर्मचारी नागेश गंगाधर पाटील (रा. हरिओम नगर) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या खंडपीठातून बुधवारी मागे घेतला.
धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर वसुली अधिकारी असलेले सी.एस. इंगळे यांचे जळगावातील महावीर नगरात वास्तव्यास आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी ते घरी नसतांना त्यांच्या घरावर टोळक्याने हल्ला करुन तोडफोड केली होती. तसेच हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी
दरवाजाजवळील खिडकीमध्ये सात हजार रुपये असलेले पाकीट, ४० हजार रुपये किमतीचे आयपॅड, दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण दोन लाख ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नागेश पाटील यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मिळवला होता. या अटकपूर्वच्या विरोधात तपासाधिकारी आणि मुळ फिर्यादींनी हरकत घेतली होती. नागेश याला अंतरिम जामीन मंजूर झाला होता, मुदतवाढीनंतर अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. यावेळी सरकारी वकीलांसह फिर्यादीच्या वकीलांनी
संशयित पाटील यांचा या हल्ल्याचा घटनेची संबंध असल्याचे निदर्शनास आणून दिले. … न्यायालयाचे विचारणा केल्यानंतर घेतला अर्ज मागे
न्यायालयाने नागेश पाटील यांच्या वकीलांना अर्ज मागे घेतात की, फेटाळायचा अशी विचारणा केली. त्यानंतर नागेश पाटील यांच्या वकीलांनी हा अर्ज मागे घेतला. सरकारच्यावतीने अॅड. मानसी घाणेकर यांनी तर फिर्यादी रेखा इंगळे यांच्यातीने अॅड. व्ही.डी. साळुंखे व अॅड. मयुर साळुंखे यांनी तर नागेश पाटीलच्या वतीने अॅड. अभयसिंग भोसले यांनी कामकाज पाहिले, याबाबतची माहिती अॅड. मयूर साळुंखे यांनी दिली.