यावलः – सातपुड्याच्या कुशीत नागादेवी धरणावरील आदिवासी वस्तीवर राहणारा ६ वर्षीय बालक हा इतर मुलांसोबत सातपुड्याच्या जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला होता. तेथे अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला ही घटना याच वस्तीतील एका २३ वर्षीय तरुणाने पाहिली आणि त्याने अस्वलाच्या तावडीतून या बालकाला सोडवले.
या बालकाच्या पाठीवर दुखापत झाली आहे तर २३ वर्षीय तरुणाला पायावर अस्वलाने नखे मारली आहेत जखमी अवस्थेत दोघांना यावल ग्रामीण – रुग्णालयात आणण्यात आले आहे. येथे यांच्यावर उपचार सुरू आहे. सातपुड्याच्या कुशीत नागादेवी धरण आहे. येथे आदिवासी वस्ती आहे. या आदिवासी वस्तीवरील राहुल राजू बारेला वय ६ हा इतर बालकांसोबत जंगलात टेंभरून खाण्यासाठी गेला होता तेथे अचानक त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला पाठीमागून अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढवला होता हा प्रकार वस्तीतीलच सुनील बारेला (वय २३) या तरुणाच्या निदर्शनास आला . त्याने आपल्या हातातील काठीने अस्वलावर प्रतिकार करून त्याच्या तावडीतून राहुल बारेला याला सोडवले. या झटापटीत सुनील बारेला याच्या पायाला देखील अस्वलाने नखे मारत किरकोळ जखमी केले आहे तेव्हा दोघांन जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. तुषार सोनवणे, अधिपरिचारिका नेपाली भोळे, अमोल अडकमोल यांनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.