
मिशन ‘सिंदुर’ च्या यशानंतर जळगावात भव्य तिरंगा यात्रा
जळगाव प्रतिनिधी l मिशन ‘सिंदुर’ ही देशभर राबवलेली एकात्मतेची मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण भारतात तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावातही भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन शुक्रवार, दि. १६ मे २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशनजवळील पुतळ्यापासून यात्रेला प्रारंभ होईल. यानंतर नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, इच्छापूर्ती गणपती मार्गे ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवतीर्थ मैदान येथे समारोपास येणार आहे.
या यात्रेत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, राजू मामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्यासह शासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या ऐतिहासिक तिरंगा यात्रेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे .