
रेल्वे खाली झोकून देत प्रौढाची आत्महत्या
जळगाव प्रतिनिधी एका 54 वर्षीय व्यक्तीने रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी आसोदा रेल्वे गेट जवळ उघडकीस आली. दरम्यान प्रौढाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नसून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुभाष पंडीत बोरसे (वय ५४, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे
शहरातील रामेश्वर कॉलनीतील सुभाष पंडीत बोरसे हे वास्तव्यास होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते घरी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला जात होता, मात्र त्यांचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळून आला.
परंतु ते मिळून आले नाही, सुभाष बोरसे यांच्या अंगावरील कपड्यांवरुन नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली.