खान्देशगुन्हे

रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतून पर्समधून ऐवज लांबविणारे तिघे जेरबंद

रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतून पर्समधून ऐवज लांबविणारे तिघे जेरबंद

१८ लाखांचा मुद्देमाला जप्त ; भुसावळ लोहमार्ग पोलिसांची कारवाई

भुसावळ प्रतिनिधी

वातानुकूलित डब्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स चोरणाऱ्या तीन परप्रांतीय चोरट्याना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दिलीपकुमार प्रथापचंद जैन (वय-५७, रा. नेल्लोर सिटी, आंध्रप्रदेश) हे ३० डिसेंबर २०२४ रोजी पत्नीसह ट्नवजीवन एक्सप्रेस मधून अहमदाबाद ते नेल्लोर प्रवास करीत असतांना भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. पर्समध्ये ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे २७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये रोख आणि २ हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन होता. जैन यांनी नेल्लोर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला.

भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, सपोनि किसन राख, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि गुन्हे प्रगटीकरण पथकाने संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास सुरू केला. गुप्त बातमी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी भुसावळ रेल्वे स्टेशनवर गुन्हा घडल्यानंतर दीड महिन्याने पकडले. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेले २३४ ग्रॅम ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, तपास पोलीस हवालदार जयकुमार रमेश कोळी आणि गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button