
बोरनार येथील इकरा उर्दू हायस्कूल येथे मराठी दिवस उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी
इकरा शिक्षण संस्था संचलित अ.मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल बोरनार ता.जि. जळगाव येथे मराठी दिवस उत्साहने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शाह सलीम होते. विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवस हा मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कविता, नाटक व इतर सखोल माहिती दिली. कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध कविता कणा हे सुद्धा इथे वाचण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांनी सखोल माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सलीम शाह यांनी मराठी भाषेच्या महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
मराठी ही आपली राज्यभाषा आहे ते आपल्याला लिहिता वाचता बोलता यायलाच पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मराठी विषय प्रमुख फिरोज खान फत्ते खान सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड आबीद पिंजारी सर यांनी केले तर त्यांना मजहर खान सर यांनी अनुमोदन दिले. आभार शेख सादिक सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी मुस्ताक भाई युसुफ भाई आकिब सर (लिपिक)यांनी सहकार्य केले.