खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल पवार यांची नुकतीच जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या “स्विकृत संचालक” पदी निवड करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र देखील त्यांना संस्थेचे मानद सचिव वीरेंद्र भोईटे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या एक्झीकेटीव्ह कमेटी मध्ये झालेल्या चर्चेनुसार सर्वानुमते एक मताने आपली जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या या संस्थेच्या एक्झीकेटीव्ह कमेटी वर “स्विकृत संचालक” म्हणून निवड करण्यात आलेली आहे. संस्थेच्या भरभराटीसाठी व विकासासाठी आपले योगदान मिळावे ही विनंती. स्विकृत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल आपले हार्दीक अभिनंदन.
ॲड.कुणाल पवार यांचे शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहे. पवार यांची निवड झाल्याने त्यांचे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.