खान्देश टाइम्स न्यूज | २९ जुलै २०२३ | मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना मोहर्रमचा विशेष दहावा दिवस यौमे आशूरा म्हणजेच इमामे हूसैन (रझी.) व ७२ शहिदाने करबला यांच्या शहादत (हौतात्म्या)ला खिराजे अकिदत (अभिवादन) करण्यासाठी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व सुन्नी ईदगाह ट्रस्ट व सुन्नी मुस्लिम गुलामाने अहेले बैततर्फे आज दि.२९ शनिवारी सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर येथे शजरकारी (वृक्षारोपण) मोहीमची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना जाबीर रझा होते. उदघाट्न मौलाना नजमूल हक यांनी केले. सर्वप्रथम सै. अयाज अली नियाज अली यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगितले कि, सर्वत्र प्रचंड वृक्ष तोड होऊन सिमेंटचे जंगल उभारून ग्लोबल वार्मिंग वाढल्यामुळे निसर्गाची अतोनात हानी होत आहे. यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्मयांना तोंड द्यावे लागत असून, प्रदूषणामुळे सजीवांचे जीवनमान घटत चालले आहे,तसेच प्रेषित मुहम्मद (सलै.) साहेबांची वृक्षारोपण ही सुन्नत (पद्धत )आहे, असे सांगितले. म्हणून आज सर्व सुन्नी मुस्लिम गुलामाने अहले बैत यांनी सै. नियाज अली भैय्या फौंडेशन व सुन्नी ईदगाह ट्रस्ट च्या माध्यमाने शजरकारी मोहीम ची सुरवात केली. याप्रसंगी विविध वृक्ष लावण्यात आले.
याप्रसंगी सै.अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, मौलाना अब्दुल हमीद, मौलाना मोहम्मद सईद, इकबाल वझीर, मुख्तार शाह, रफिक कुरेशी, असलम बाबा अशरफी, शाकीर चित्तलवाला, सय्यद जावेद, अफझल मनियार, वसीम खान, सय्यद उमर, कामिल खान, शफी शेख, शकुर बादशाह, सलमान मेहबूब, अता-ए-मोहम्मदअली , झिशान रियाझ अली, मतीन नुरबशर, हाजी एहसान अली इ. उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सलातो सलाम व दुआने करण्यात आली.