
प्रा. संजय मोरे यांना राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित
सिंगनुर, ता. रावेर: सामाजिक आणि जनसेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी प्रा. संजय मोरे यांना हरियाणातील कर्नाल येथे “राष्ट्रीय ग्लोबल आयकॉन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव व्यक्ती आहेत.
हरियाणातील नूर महल इंटरनॅशनल हॉटेल, कर्नाल येथे आयोजित सोहळ्यात अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया आणि मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन यांच्या वतीने देशभरातील ३० मान्यवरांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रा. संजय मोरे हे अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या गौरवपूर्ण योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सोहळ्याला राष्ट्रीय अध्यक्ष रणज्योत सिंह, अँटी करप्शन मानव अधिकार सुप्रीमो नरेंद्र अरोरा, तसेच फिल्म अभिनेता दिलीप ताहिल, अभिनेत्री सुधा चंदन आणि “आशिकी” फेम अभिनेता राहुल रॉय हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. मोरे व त्यांची पत्नी मायाताई मोरे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले.
प्रमुख मान्यवरांनी केले कौतुक
प्रा. संजय मोरे यांच्या या यशाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. ए. कोळी, आ. गिरीश व्यास, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मित्रपरिवार व शुभेच्छांचा वर्षाव
प्रा. संजय मोरे यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल डॉ. दशरथ भांडे, अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. धनराज बावस्कर, तसेच इंजि. प्रज्ञारत्न मोरे, इंजि. वैष्णवी मोरे, प्रा. स्नेहा सोनवणे, प्रा. अनिल सपकाळे, मयूर कोळी आणि असंख्य मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
या राष्ट्रीय पुरस्कारामुळे प्रा. संजय मोरे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला नवा आयाम मिळाला असून, हा त्यांच्यासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.