खान्देशगुन्हेजळगांव

अवैध दारू अड्ड्यांवर छापा, 27 जणांना अटक!

जळगाव एमआयडीसी पोलीसांची मोठी कारवाई –

अवैध दारू अड्ड्यांवर छापा, 27 जणांना अटक!

जळगाव

होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कंजरवाडा, तांबापुर, शिरसोली परिसरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई करण्यात आली. या छाप्यामध्ये अवैध दारू निर्मितीच्या 10,015 लिटर रसायनासह तब्बल 7,01,620/- रुपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, 27 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध दारू विक्री व निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली

या मोहिमेत 11 अधिकारी, 48 पोलीस अंमलदार, 22 होमगार्ड तसेच RCP व QRT पथकाचा समावेश होता.  जळगाव पोलीस दलाच्या या धडक कारवाईमुळे शहर व परिसरातील अवैध दारू विक्रीला आळा बसणार असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा मोठा यशस्वी ऑपरेशन मानले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button