
मुंबई, – सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ जाहीर केली असून, हा बदल आजपासून (मंगळवार, ८ एप्रिल) लागू करण्यात आला आहे.
या बदलानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर १३ रुपये, तर डिझेलवरील शुल्क १० रुपये झाले आहे. तथापि, दर वाढले असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, ही सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब आहे.
तुमच्या शहरातील इंधन दर काय आहेत? (८ एप्रिल २०२५)
इंधन दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. खाली महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोल व डिझेल दर दिले आहेत:
शहर | पेट्रोल (₹/लिटर) | डिझेल (₹/लिटर) |
---|---|---|
मुंबई | 103.50 | 90.03 |
पुणे | 104.03 | 90.56 |
नागपूर | 104.58 | 91.13 |
औरंगाबाद | 105.18 | 91.68 |
नाशिक | 104.10 | 90.63 |
कोल्हापूर | 104.44 | 90.99 |
सोलापूर | 104.62 | 91.15 |
जळगाव | 105.50 | 92.02 |
अमरावती | 105.43 | 91.94 |
नांदेड | 105.49 | 92.03 |
रत्नागिरी | 105.50 | 92.03 |
सातारा | 105.32 | 91.81 |
सिंधुदुर्ग | 105.50 | 92.03 |
ठाणे | 103.80 | 90.31 |
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. मात्र, तेल कंपन्या त्यानुसार दरांमध्ये तातडीने बदल करत नाहीत. तसेच, राज्य पातळीवरील व्हॅट, स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन यांचा एकत्रित परिणाम इंधन दरांवर होतो.
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केली असली तरी, ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर याचा फटका बसू नये म्हणून दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत.