
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने वक्फ (सुधारणा) कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदींवर अंतरिम स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारला सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले असून, तोपर्यंत कोणतीही नवीन कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. सरकारला कायद्यातील दोन विशिष्ट कलमांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले असून, या कालावधीत वक्फ मालमत्तांशी संबंधित कोणतीही नवीन अधिसूचना जारी करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालयाने संपूर्ण वक्फ कायद्यावर नव्हे, तर केवळ काही विशिष्ट तरतुदींवर स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे २०२५ रोजी होणार आहे.