खान्देशजळगांवशिक्षण

मंत्री गिरीश महाजन पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर येथे रवाना

मुंबई वृत्तसंस्था ;– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगर येथे रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील इतर पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. .

या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेले संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.

मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button