जळगांव l भडगाव प्रतिनिधी l ११ जून २०२३ l शहरातील पाचोरा रोड वरील शासकीय आय.टी.आय जवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत काळवीटाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.१० रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक मुकेश बोरसे हे घटना स्थळी जाऊन मृत काळवीटताला ताब्यात घेत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडे उपचारासाठी आणले असता पशुवैदयकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. यावेळी काळविट चे शवविच्छेदन करुन वनसंरक्षक पाचोरा यांच्या उपस्थितीत मृत काळवीटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास वनपाल भडगाव हे करीत आहेत.