खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक वाळू चोरी होत असते. तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू माफियांशी संबंध असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी केली आहे.
दीपक गुप्ता यांनी केलेल्या तक्रारनुसार, तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांचे वाळू माफियांशी अवैध आर्थिक संबंध देखील आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर देखील घेतले आहे. इतकंच नव्हे तर दापोरा येथे त्यांनी ५० ब्रास वाळूचा ठिय्या मांडला आहे.
गुप्ता यांनी विभागीय महसूल आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी तक्रार केली आहे. गुप्ता यांच्या तक्रारीने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.