गुन्हेशासकीयसामाजिक

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराची संधी 

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ग्रामीण भागातील युवक युवतींना रोजगाराची संधी 

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत 7525 युवक युवतींना मिळाला रोजगार 

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत 7525 युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील युवक व युवतीना रोजगार उपलब्ध करुन देणे. या युवक, युवतीशी सतत संपर्कात राहणे, सदर रोजगार सप्ताहामध्ये 7500 युवक, युवतीशी पोलीसांनी संपर्क केलेला आहे. ज्या युवक, युवतीना पोलीस भरती मध्ये नोकरी मिळाली नाही त्यांचे वेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना गुन्हेगारी पासून परावृत करण्यासाठी किवा वाममार्गाना लागु नये या साठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक  कुमार चिंता  यांचे संकल्पनेतून गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यापेक्षा गुन्हेगार घडणारच नाही, या साठी यवतमाळ जिल्हयातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले रोखण्यासाठी तसेच भटकलेले व वाममार्गाला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बरोजगारांना विविध व्यावसायीक प्रशिक्षण देवून प्रत्यक्ष रोजगारांची संधी उपलब्ध करुण देण्यासाठी 1

प्रशिक्षण केंद्र राळेगांव यांना पाचारण करण्यात आले होते.

यवतमाळ जिल्हया मध्ये दिनांक 17 फेब्रुवारी ते दिनांक 23 फेब्रुवारी पर्यंत  यवतमाळ, पुसद, उमरखेड, पांढरकवडा, वणी, या ठिकाणी मेळावा आयोजीत करुण यवतमाळ येथे 2920, पुसद मध्ये 1160, उमरखेड 950, पांढरकवडा, 1175, वणी 1320 असे एकूण 7525 युवक, युवतीनी संपर्क केला. या सर्व युवक, युवतीना आलेल्या सर्व कंपन्या रोजगार उपलब्ध करुण देणार आहे.

या युवक, युवतीना 1) Scurity Guard and Supervisor 2) Justin Foundation nursing

assistants and caretakers 3) bpo positions 4) logistics roles at gmr airport 5) marketing executives 6) manufacturing roles in the automobile industry 7) in store sales positions या प्रकारचे रोजगार मिळणार आहे.

 

सदर मेळाव्या करीता हजर असलेल्या उमेदवार यांची निवड करुन काही उमेदवार यांना नियुक्ती पत्र दिले व इतर पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याचे उदघाटन मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी करुन उमेदवार यांना मोलाचे मार्गदर्शन करुन नोकरी कामी मोठया शहरात जाण्याचे आव्हाण केले. रोजगार मेळाव्या करीता निवड झालेल्या उमेदवार यांना मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या .हा रोजगार मेळावा मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतुन पार पडला. हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी पोलीस कल्याण शाखा व नागरी कृती शाखा येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button