खान्देशगुन्हेजळगांव

बोलेरोची स्विफ्ट कारला धडक ; पिता जागीच ठार तर मुलगी गंभीर जखमी 

धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळील घटना

बोलेरोची स्विफ्ट कारला धडक ; पिता जागीच ठार तर मुलगी गंभीर जखमी 

धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथून मुलीच्या एमबीए सीईटी परीक्षेनंतर जळगावात परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पिंप्रिं गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर कॉलनीतील एका पित्याचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आणि एक सहप्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेने शासकीय रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश आणि परिसरात हळहळ व्यक्त झाली.

मृत व्यक्तीचे नाव महेश सुरेश सोनार (वय ४५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे आहे. ते पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते आणि पाण्याच्या जारच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी सकाळी त्यांची मोठी मुलगी नयना सोनार हिचा एमबीए सीईटीचा पेपर असल्याने ते तिला घेऊन मित्र राजेश मिठूलाल धूत (वय ४६, रा. दौलत नगर, जळगाव) यांच्यासह स्विफ्ट कारने अमळनेर येथे गेले होते.परीक्षा संपवून दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पिंप्रिं गावाजवळ परत येत असताना त्यांच्या कारला एका भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी महेश सोनार यांना तपासून मृत घोषित केले. नयना सोनार आणि राजेश धूत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.रुग्णालयात आक्रोश,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button