जळगांव
माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या साखळी उपोषणानंतर सुप्रीम कॉलनीतील रस्त्यांची दुरुस्ती
जळगाव l ०४ ऑगस्ट २०२३ l शहरातील सुप्रीम कॉलनी मधील संत गजानन महाराज मंदीरामागील गट नं १८१ मध्ये अमृत योजनेच्या कामामुळे व पावसाच्या पाण्यामुळे कॉलनीतील रस्त्याची बिकट अवस्था झाली होती, याबाबत स्थानिक नगरससेवकला कल्पना दिली होती. मात्र या समस्याकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर परीसरातील रहिवाश्यांच्या रस्ता समस्याबाबतचे साक्षरीसहीत निवेदन मनपा आयुक्त यांना देण्यात आले. त्यांनीही दुर्लक्ष केले शेवटी आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाची प्रत जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विनभाऊ सोनवणे यांना दिली. त्यांनी ही समस्या मार्गी लावुन अमृत योजनेमुळे व पावसाच्या पाण्यामुळे झालेली रस्त्याची बिकट अवस्थाची आज मुरुम टाकून डागडुजी केली. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांनी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विनभाऊ सोनवणे यांचे आभार मानले.