पुनीत अग्रवाल यांची भुसावळ रेल मंडळच्या, मंडळ रेल प्रबंधक (DRM) पदी नियुक्ती

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) म्हणून पुणीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या NHSRCL (National High Speed Rail Corporation Limited) या प्रकल्पावर डेप्युटेशनवर असून आता त्यांची नियुक्ती भुसावळ विभागात करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे राष्ट्रपतींच्या मान्यतेने निर्णय घेण्यात आला असून, Ms. Ity Pandey (IRTS) यांच्याऐवजी पुणीत अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. आयटी पांडे यांच्या बदलीसंबंधीचे आदेश लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, असे आदेशात नमूद आहे.
ही नियुक्ती CAT (Central Administrative Tribunal), नवी दिल्ली व CAT, चेन्नई यांच्या ९ मे २०२५ व १८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशांनुसार करण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाचे संचालक (विशेष प्रस्थापना) रवींदर पांडे यांनी हा आदेश जारी केला आहे.
