
सय्यदा मुज्जयाबा गाझीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९२.६०% गुणांसह उंचावले कुटुंब-शाळेचे नाव
परभणी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, परभणी शहरातील मोयद-ए-सुलेमान हायस्कूलची हुशार विद्यार्थिनी सय्यदा मुज्जयाबा गाझी हिने ९२.६०% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अॅडव्होकेट सय्यद जावेद कादर (अलिग) यांची नात आणि सय्यद गाझी जावेद यांची कन्या असलेल्या मुज्जयाबाने आपल्या अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीने कुटुंबासह शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.सय्यदा मुज्जयाबा केवळ अभ्यासातच नव्हे, तर इतर शालेय स्पर्धांमध्येही अव्वल ठरली आहे.
विशेषतः भाषण स्पर्धांमध्ये तिच्या प्रभावी सादरीकरण शैलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने आपल्या या यशाचे श्रेय शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाला दिले आहे.
मुज्जयाबाच्या या यशाने परभणी शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.