खान्देशजळगांवशिक्षण

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे घवघवीत यश

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे घवघवीत यश

दहावी परीक्षेत ९९.४% गुण; जिल्ह्यात प्रथम क्रमांक

जळगाव प्रतिनिधी  येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९९.४ टक्के गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्वल यशामुळे शाळेसह संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

मानसीने गणित, विज्ञान आणि संस्कृत या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवत एकूण ५०० पैकी ४९७ गुणांचे घवघवीत यश मिळवले. तिच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ असल्याचे ती नमूद करते.

मानसीच्या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक, नातेवाईक तसेच समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button