खान्देशगुन्हेजळगांव

वाहतूक शाखेच्या आवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

वाहतूक शाखेच्या आवारात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयाच्या आवारातील वाहतूक शाखेच्या कार्यालय परिसरात सुमारे ३० वर्ष वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मृत इसमाला पोलिसांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button