
बिग ब्रेकिंग : संत मुक्ताई यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीसह तरुणींची छेड
मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात चार टवाळखोरांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला असून या घटनेनंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे .राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून, खडसे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात मंत्री रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात चार तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या असून, त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
संत मुक्ताई यात्रेत मोठ्या संख्येने भक्तगण व नागरिक सहभागी होतात. यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस प्रशासनाला चांगलेच सुनावले. “मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि कोथळी येथे दरवर्षाप्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण काही मुलींसोबत सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले .