खान्देशगुन्हेजळगांव

महागडे मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात

महागडे मोबाईल चोरणारा अल्पवयीन चोरटा ताब्यात

एमआयडीसी पोलिसांची २४ तासांत कामगिरी;  २ लाखांचे मोबाईल जप्त, 

जळगाव (प्रतिनिधी):
शहरातील एमआयडीसी पोलिसांनी एक मोठा गुन्हा केवळ २४ तासांत उघडकीस आणत दोन ॲपल आयफोन आणि एक वन प्लस मोबाईल असा सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

नशेमन कॉलनीतील रहिवासी तन्वीर मजहर पटेल यांच्या घरात १८ मे २०२५ रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मोबाईल चोरले होते. त्यांच्या फिर्यादीनुसार १९ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली.

दरम्यान, फिर्यादीच्या घराजवळ संशयास्पद हालचाल करत असलेल्या अल्पवयीन मुलाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विविध भागांत शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली, आणि त्याच्याकडून सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीत डीबी पथकातील पो.उ.नि. राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, योगेश बारी, योगेश घुगे यांचा मोलाचा सहभाग होता.

पुढील तपास पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button